पावसाळी कामाचे दीडशे कोटी पाण्यात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

मुंबई -  महापालिकेने पावसाळी कामांसाठी खर्च केलेले सुमारे दीडशे कोटी मॉन्सूनपूर्व पावसातच पाण्यात गेले असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, गुरुवार (ता. 7) च्या पावसाने काही काळ पाणी तुंबले होते; पण त्याचा निचराही वेगाने झाला, असा दावा महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी केला आहे. 

पालिकेने नालेसफाई आणि पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांसाठी सुमारे 180 कोटी रुपये खर्च केले. मात्र, किरकोळ पावसात शहरातील अनेक भागांत पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. मुंबईतील पर्जन्यवाहिन्या तासाला 50 मिमी पावसाच्या पाण्याचा निचरा करू शकतात, पण त्याहून निम्मा पाऊस पडूनही पाणी साचले होते. 

पालिका पावसाळापूर्व तयारीसाठी करत असलेला खर्च नागरिकांसाठी नसून कंत्राटदारांसाठी आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. अवघ्या 30 ते 40 मिमी पावसात अशी अवस्था होते. जुलै-ऑगस्टमध्ये तासाला याहून दुप्पट पाऊस पडतो. तेव्हा काय परिस्थिती होणार याचा अंदाज आताच येत असल्याचेही त्यांनी नमूद केले. पावसाचा जोर पाहून मुंबईत अनेक ठिकाणी पाहणी केली. काही काळ पाणी साचले होते; पण त्याचा निचरा वेगाने झाला, असा दावा महापौरांनी केला. 

पावसाळी तयारीसाठी खर्च 
- नालेसफाई - 129 कोटी 
- पाणी उपसण्यासाठी 298 पंप - 54 कोटी 

- वरळीत सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान 50 मिमी पाऊस झाला. तिथेही पाणी तुंबले. 
- परळ (एफ दक्षिण प्रभाग) सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत 48 मिमी पाऊस झाला. दादर, परळ, हिंदमाता आदी परिसरात गुडघाभर पाणी तुंबले होते. 
- घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, मालाड, कांदिवली, जोगेश्‍वरी, वांद्रे आदी परिसरात पाणी तुंबले. 

Web Title: rainy season of 1.5 million crores of water