उल्हासनगरात धडाडणार राज ठाकरेंची तोफ

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : जुन्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नतीच्या बढतीची आणि पालिकेच्या शाळांना झळाळी व राज्यातील पहिलीच वातानुकूलित डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारे बंडू देशमुख यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ टाकणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे तब्बल 10 वर्षानंतर उल्हासनगरात आगमन होत आहे. 3 मे रोजी ठाकरे यांची त्यांच्या शैलीची तोफ धडकणार आहे. एकही नगरसेवक नसलेल्या उल्हासनगरातील मनसेत नवचैतन्य ठाकरे यांच्या आगमनाने येण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

राज ठाकरे यांनी मनसे नेते राजू पाटील, सरचिटणीस प्रकाश भोईर ,राज्य उपाध्यक्ष अशोक काका मांडले आणि ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या अहवाला नुसार बंडू देशमुख यांची 10 एप्रिल रोजी अध्यक्ष पदी नियुक्ती केली.देशमुख यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या अंतर्गत भेटीगाठी घेण्यास आणि रणनीती आखण्यास सुरवात केली. मात्र पंधरवाडा उलटून गेल्यावरही साधा शुभेच्छांचा कटाऊट शहरात झळकला नसल्याने मनसेत निःशब्द सन्नाटा पसरल्याचे चित्र दिसत होते. राज ठाकरे यांनी 17 दिवसानंतर कल्याण उपजिल्हाध्यक्ष तथा माजी अध्यक्ष सचिन कदम-उल्हासनगर-अंबरनाथ जिल्हाध्यक्ष,पूर्वेचे माजी अध्यक्ष प्रदीप गोडसे-उल्हासनगर उपजिल्हा अध्यक्ष(कांबा,वरप,म्हारळ गावांचा समावेश),पश्चिमेचे माजी अध्यक्ष संजय घुगे-उल्हासनगर-अंबरनाथ उपजिल्हा सचिव, शालिग्राम सोनावणे उल्हासनगर शहर सचिव,सचीन बेंडके-शहर उपाध्यक्ष कॅम्प क्र.1, ऍड. अनिल जाधव शहर उपाध्यक्ष कॅम्प क्र.4, शैलेश पांडव शहर उपाध्यक्ष

कॅम्प क्र.5 या पदाधिकाऱ्यांच्या पदोन्नत्या केल्या आहेत.यात 20 दिवसांपूर्वी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेले माजी उपाध्यक्ष तथा पालिकेतील मनसे कामगार युनिटचे अध्यक्ष दिलीप थोरात,माजी उपाध्यक्ष मैनुद्दीन शेख यांना जिल्हा किंबहूना शहर कार्यकारिणीचे पद देण्यात आले नसून त्यांची कोणत्या पदावर वर्णी लावली जाते.हा चर्चेचा विषय बनला आहे.

दरम्यान 3 मे रोजी राज ठाकरे हे उल्हासनगरात येत आहेत.त्यांचे आगमन हे सत्तेत किंबहूना एकही नगरसेवक नसतानाही अनेक प्रकरणे तडीस नेणाऱ्या मनसेसाठी टर्निंग ठरण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com