उद्या राज ठाकरेंची तोफ धडाडणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात रणशिंग फुंकलं आहे.यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेत राज्यातील स्थानिक नेत्यांशी चर्चा ही केली होती.

मुंबई : मनसेचा 5 ऑगस्टचा रद्द झालेला कार्यकर्ता मेळावा शुक्रवारी 9 ऑगस्टला होत आहे. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिरात हा मेळावा पार पडणार असून राज ठाकरे यांचा लोकसभा निवडणुकीनंतरचा हा पहिलाच मेळावा असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

राज ठाकरे यांनी ईव्हीएम विरोधात रणशिंग फुंकलं आहे.यासंदर्भात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेत राज्यातील स्थानिक नेत्यांशी चर्चा ही केली होती. यानंतर सर्वपक्षिय पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरें ईव्हीएमच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली.यानंतर हा कार्यकर्ता मेळावा होत असून राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

लोकसभा निवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी भाजच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता.उद्याच्या मेळाव्यात ही ते भाजपला लक्ष करण्याची शक्यता असून कलम ३७० बाबतच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत केल्यानंतर उद्याच्या मेळाव्यात ते नेमकं काय बोलणार याबाबतही उत्सुकता आहे.विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत.या निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे.उद्याच्या मेळाव्यात ते आपली निवडणुकीबाबतची भूमिका स्पष्ट करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray conduct meeting tomorrow for EVM for party workers