Raj Thacekray : राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट; चर्चांना उधाण

Raj Thackeray Eknath Shinde
Raj Thackeray Eknath ShindeSakal

मुंबई - मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात नवनवीन घटना घडत आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चा आता थांबल्या आहेत. त्यातच आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर जावून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

Raj Thackeray Eknath Shinde
BMC Election: मुंबई महापालिकेच्या प्रभागाचा विषय सुप्रीम कोर्टात! ठाकरे गटाचा मोठा निर्णय

राज ठाकरे यांच्यासोबत मनसेचे इतर नेतेही उपस्थित होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्दावरून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान बीडीडी चाळीच्या समस्या, अवकाळी पाऊसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणेबाबत, नवी मुंबईतील सिडको सोडतधारकांचं शिष्टमंडळ आठ हजार मराठी कुटुंबाच्या घरांसाठी राज ठाकरेसोबत मुख्यमंत्र्यांना भेटलं. त्यामुळे हे प्रश्न कसे मार्गी लागतात हे पाहवं लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com