रुग्णालयात लता दीदींच्या भेटीनंतर काय म्हणालेत राज ठाकरे ?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 November 2019

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता दीदींची रुग्णालयात भेट घेतली. आठवड्याभरापासून लता दीदी रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर हृदयातील जंतू संसर्गामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूर केली. 

दीदी, तुमच्यातली इच्छाशक्ती आणि तमाम हिंदुस्थानीयांच्या प्रार्थनेचं बळ इतकं मोठं आहे की ह्या आजारातून तुम्ही लवकरच ठणठणीत बऱ्या होणार आहात. आम्ही सगळेच आमच्या दीदींसाठी मनापासून प्रार्थना करतोय. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यानी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.  

लता मंगेशकर याचं वय आता 90 वर्ष आहे. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान काल सोशल मिडियावर लता दीदींच्या तब्येतीबद्दलच्या बातम्या फिरत होत्या. त्यामुळे सर्वांनाच त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत होती. अशातच ANI या वृत्तसंस्थेने लता दीदी यांची तब्येत चांगली असल्याची दिलासादायक बातमी दिली. लता दीदी यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होतेय. अशात आता मंगेशकर कुटुंबीय लता दीदी घरी परतण्याची वाट पाहतायत.

WebTitle : Raj Thackeray Met Lata Mangeshkar   

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Met Lata Mangeshkar