
Thane : मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार ठाणे जिल्ह्याचा दौरा, पक्ष संघटनाचा घेणार आढावा
डोंबिवली - मनसे अध्यक्ष राज ठाकरे या आठवड्याच्या शेवटी ठाणे जिल्हाच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण असल्याचे बोलले जात आहे. ठाणे जिल्ह्यात मनसे ताकद चांगली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे ठाणे जिल्हातीलचं भूमिपुत्र आहेत.
यामुळे ठाणे जिल्ह्यात पक्षाची ताकद आणखी वाढविण्याच्या दृष्टीने मनसे कामाला लागली आहे. वसई पासून ठाणे जिल्हातील ग्रामीण भाग, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि नंतर ठाणे असा दौरा मनसे अध्यक्ष राज ठाकरे असल्याची माहिती मिळत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे या आठवड्यात ठाणे जिल्हाच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 12 ते 15 मे दरम्यान हा दौरा असून राज ठाकरे पहिले वसईला जातील आणि ठाणे जिल्हातील ग्रामीण भाग करत बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली आणि नंतर ठाणे शहरात येतील.
दरम्यान डोंबिवलीत ते राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबत त्याचे सुपुत्र आणि मनवीसे अध्यक्ष अमित ठाकरे, मनसे नेते बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यंकर, नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे आणि इतर नेते सोबत असतील. या दौऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असून बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली शहरातील येथील पक्ष संघटनाचा आढावा घेणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे येत्या काही दिवसात येणार असल्याने आज अंबरनाथ मध्ये पदाधिकारी यांची बैठक लावण्यात आली आहे. या सर्व दौऱ्याचे नियोजन मनसे जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे आमदार राजू पाटील करत आहे समजते.
ठाणे जिल्ह्यात मनसे ताकद चांगली आहे.मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे सुद्धा ठाणे जिल्हातीलचं भूमिपुत्र आहेत.तर कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, येथे मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेचं, तर राज ठाकरे यांना मानणारा वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हा दौरा मनसे करता महत्वाचा ठरणार आहे.