PHOTO : असा आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अधिकृत नवा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 January 2020

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष कात टाकताना पाहायला मिळतोय. आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याचंच अवचित्य साधत राज ठाकरे यांनी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्यावहिल्या महामेळाव्याचं आयोजन केलंय. मुंबईतील गोरेगावात नेस्को ग्राऊंडमध्ये या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपला ट्रॅक बदलत असताना यातील महत्त्वाची बाबा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बदलेल झेंडा. अनेक दिवसांपासून मनसेच्या याच नव्या झेंड्याची सर्वांनाच प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा आज संपली आहे. स्वतः राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या ध्वजाचं अनावरण केलं . 

या झेंड्यावर काय असणार यांची सर्वांना प्रचंड उत्सुकता होती. अशात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन झेंड्यावर शिवमुद्रा पाहायला मिळतेय. या झेंड्याच्या वरच्या भागात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' असं  देखील लिहिलं आहे. त्याचसोबत भगव्या रंगावर शिवमुद्रा पाहायला मिळतेय. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  यांना वंदन करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नव्या झेंड्याचं अनावरण केलं आहे. 

No photo description available.

मोठी बातमी - महाराष्ट्रधर्मासाठी 'अमित ठाकरे' सक्रिय राजकारणात..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून झेंड्याचं अनावरण झाल्यानंतर सर्वच मनसैनिकांकडून जल्लोष केला गेला. नवीन झेंड्याच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नवचैतन्य मिळेल असं मनसे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. नवीन झेंडा पाहून उर अभिमानाने भरून आला असं मनसे नेत्यांचं म्हणणं आहे. 

raj thackeray officially disclosed new flag of maharashtra navanirman sena 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray officially disclosed new flag of maharashtra navanirman sena