विचारधारा वेगळ्या; तरी सुषमाजी सर्वांशी जुळवून घ्यायच्या : राज ठाकरे

वृत्तसंस्था
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्व स्तरातील व सर्व पक्षातील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे.

मुंबई : 'सुषमा स्वराज म्हणजे भारतीय राजकारणातील एक सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. विचारधारा वेगळ्या असल्या तरी प्रत्येकाशी जुळवून घेण्याची त्यांची वृत्ती कायम लक्षात राहील. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं सुषमाजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.' असे ट्विट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सुषमा स्वराज यांच्या निधनाचे वृत्त कळताच सर्व स्तरातील व सर्व पक्षातील नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. तसेच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शोक व्यक्त केला आहे. आता राज ठाकरे यांनीही सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व हरपल्याबाबत शोक व्यक्त केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj thackeray pays tribute to Sushma Swaraj