अमित ठाकरे यांचा विवाह थाटात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 जानेवारी 2019

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत शाही थाटात विवाह  झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा आज मान्यवरांच्या उपस्थितीत शाही थाटात विवाह  झाला. या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. 

लग्नसोहळ्याला राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय, जयदेव ठाकरे आणि कुटुंबीय, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि कुटुंबीय, उद्योगपती रतन टाटा, अजित पवार, सुनेत्रा पवार, पार्थ पवार, पंकजा मुंडे आणि त्यांचे पती, रश्‍मी ठाकरे, उज्ज्वला शिंदे, प्रणिती शिंदे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. अंजली तेंडुलकर, पद्मजा फेणाणी, आशा भोसले, बाबासाहेब पुरुंदरे, शायना एन. सी., आमिर खान, उत्तरा केळकर आदी या वेळी उपस्थित होते. अमित आणि मिताली यांचा विवाह सेंट रेजिस हॉटेलमध्ये झाला.

राहुल गांधी विवाह सोहळ्यास अनुपस्थित
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय चर्चांना येणारे उधाण आणि राज्यातील उत्तर भारतीय मतदारांतील संभ्रम टाळण्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राज ठाकरे यांचे पुत्र अमित यांच्या लग्नाला येण्याचे टाळल्याची माहिती काँग्रेसच्या सूत्रांनी दिली. राहुल गांधी मुंबईत राज ठाकरे यांच्या मुलाच्या लग्नाला यावे, अशी काँग्रेस नेत्यांची इच्छा होती; परंतु गांधी यांच्या अमितच्या लग्नाला न येण्याच्या निर्णयामुळे राजकीय चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

Web Title: Raj Thackeray son Amit gets married to Mitali Borude