
राज ठाकरे उद्या लीलावतीत दाखल होणार; शस्त्रक्रियेची तारीख ठरली!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शस्त्रक्रियेची ताऱीख निश्चित झाली आहे. त्यासाठी राज ठाकरे उद्या लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे यांना पायाचा त्रास होत आहे. त्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. पायाचा त्रास बळावल्याने त्यांनी अयोध्या दौराही रद्द केला होता. (Raj Thackeray wii be admitted in Lilavati Hospital tomorrow)
हेही वाचा: भाजपाच्या विरोधादरम्यान राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित
राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर १ जून रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. या शस्त्रक्रियेनंतर त्यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. त्यामुळे अयोध्या दौरा आणि भोंगा प्रकरण दरम्यानच्या काळात काहीसं थंडावण्याची चिन्हं आहेत. १ जून रोजी होणाऱ्या या शस्त्रक्रियेसाठी राज ठाकरे उद्या मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital Mumbai) दाखल होणार आहेत.
हेही वाचा: वाढलेल्या वजनावर राज ठाकरे म्हणाले, "शिव्या खातो म्हणून..!"
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात राज ठाकरेंनी या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती. आपण आरोग्यासंदर्भात कायम टाळाटाळ करत राहतो. आणि त्यामुळे आता त्रास बळावला आहे. म्हणून आपण शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती राज ठाकरेंनी दिली होती.
Web Title: Raj Thackeray Surgery In Lilavati Hospital On 1 June Will Admit In Hospital Soon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..