हज यात्रेच्या अनुदानबंदीवर राज ठाकरेंचे व्यंगचित्र

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

मुंबई - मोदी सरकारच्या हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढले असून, त्यांच्या फेसबुक पेजवर हे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. '(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म' असे शीर्षक देऊन हे व्यंगचित्र रेखाटण्यात आले आहे.

भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलताना या व्यंगचित्रात दाखविले आहे. मोदी यांच्या मागे भारतीय हज यात्रेकरू उभे आहेत, तसेच 'ते अनुदान काढून घेतलेत ते योग्यच आहे. देशात इतरही खूप फुटकळ अनुदाने आहेत. तीपण काढून घ्या. त्याचप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानातील घुसखोर यांनाही हाकलून द्या असे भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे असे हे व्यंगचित्र आहे. तर या घुसखोरांच्या मागे 'भारतातील अतिरेकी घडवणारे मदरसे' असे चित्रही रेखाटण्यात आले आहे.

Web Title: raj thackerays cartoon on the decision to haj subsidy