राज ठाकरे तीनऐवजी चार तारखेला उल्हासनगरात

दिनेश गोगी
मंगळवार, 1 मे 2018

उल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे तीनऐवजी चार मे रोजी उल्हासनगरात येत आहेत. ठाकरे यांनी नव्या कार्यकारिणीच्या नियुक्त्या केल्यानंतर त्यांची ही पहिलीच सभा शहीद जनरल अरुणकुमार वैद्य टाऊन हॉल मध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आज मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाध्यक्ष सचिन कदम, शहराध्यक्ष बंडू देशमुख, उपजिहाध्यक्ष प्रदीप गोडसे, जिल्हा सहसचिव संजय घुगे, शहर सचिव शालिग्राम सोनवणे, मनविसे शहराध्यक्ष मनोज शेलार उपस्थित होते.

मनसेचा एकही नगरसेवक नसला तरी आम्ही एलबीटी घोटाळा उघडकीस आणला, अनेक एकरचा अतिक्रमण होत असलेला भूखंड पालिकेला मिळवून दिला, त्यावर तहसीलदारांनी बोर्ड लावला. मुस्लिमांच्या कब्रस्तानसाठी पाठपुरावा केला, अशी माहिती सचिन कदम यांनी दिली.

मात्र अलीकडेच शहराध्यक्ष झालेले बंडू देशमुख यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे उल्हासनगर मध्ये महाराष्ट्रातील पहिलीच वातानुकूलित अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका उभी राहिली. या गौरवपूर्ण आणि मनसेसाठी भूषणावह असलेल्या वास्तूचा कदम यांनी उल्लेख केला नाही, ही बाब पत्रकारांनी कदम यांच्या निदर्शनास आणून देताच, हा विषय यादीत आहे, तो अनावधानाने सांगण्यास राहून गेला.असे स्पष्टीकरण कदम यांनी दिले.

दरम्यान, आजच्या पत्रकार परिषदेत मनसेचे पदाधिकारी एकत्र दिसल्याने बंडू देशमुख यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतरचे बेबनावाचे चित्र मावळत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Web Title: Raj Thackray will address a rally at Ulhasnagar on 4th May