लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा आरोग्योत्सव सुरू; केईएम रुग्णालयाच्या वतीने राबवणार प्लाझ्मादान शिबिर

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा आरोग्योत्सव सुरू; केईएम रुग्णालयाच्या वतीने राबवणार प्लाझ्मादान शिबिर

मुंबई - लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवात आयोजित केलेल्या आरोग्योत्सवात प्लाझ्मादान शिबीराला आजपासून सुरुवात झाली आहे. 3 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट या संपुर्ण महिन्यात लालबाग मंडळ आरोग्योत्सव राबवणार आहे. दरम्यान, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या या प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. 

महिनाभर राबवण्यात येणार्या या प्लाझ्मा दान शिबिरात किमान 1000 जणांची तपासणी करुन 100 लोकांचे प्लाझ्मा गोळा करण्याचा उद्देश्य असल्याचे केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले आहे. या शिबिरात केईएम रुग्णालयातील डॉक्टर्स स्वतः प्लाझा गोळा करण्याचे काम करणार आहेत.

प्लाझ्मादान नोंदणी आजपासून ते 31 ऑगस्टपर्यंत सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत करता येईल. हे शिबीर के. ई. एम. रक्तपेढीच्या सहकार्याने राबवले जात आहे. त्याखेरीज गलवान खोऱ्यात हुतात्मा झालेल्या 22 भारतीय सैन्यजवानांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कारही या आरोग्योत्सवात केला जाईल. 

तसेच, गणेशचतुर्थी दरम्यान 22 ते 31 ऑगस्ट या दहा दिवसांत सकाळी 10 ते संध्याकाळी पाच या वेळात रक्तदान शिबीरही आयोजित केले जाईल, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. 

आज या शिबिराचे उद्घाटन झाले आहे. उद्यापासुन प्लाझा दान आणि तपासणी करायला सुरुवात होईल. किमान 100 लोकांचे प्लाझ्मा गोळा करायचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी हजार लोकांची चाचणी करावी लागेल. 

डॉ. अरुण घुले, ट्रांन्सफ्युझन विभाग, केईएम रुग्णालय

कोरोनाची स्थिती लक्षात घेता, लालबागसह मुंबईतील इतरही गणेश मंडळांनी "आरोग्य उत्सव" साजरा करून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी गणेश मंडळांना केले होते. आता त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com