esakal | राजेंद्र चौधरी यांचे नगरसेवकपद कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

राजेंद्र चौधरी यांचे नगरसेवकपद कायम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : अनधिकृत बांधकाम प्रकरणात हस्तक्षेप केल्याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र राजेंद्र चौधरी चौधरी यांचे पद रद्द करण्याची याचिका तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाने नागपूर महानगरपालिकेच्या एका खटल्याचा हवाला देत निंबाळकर यांची याचिका रद्द केल्याने चौधरी यांना दिलासा मिळाला असून, त्यांचे नगरसेवक पद कायम राहिले आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवानंतर दररोज 60,000 कोविड चाचण्यांचे पालिकेचे लक्ष्य

ऑक्टोबर २०१७ मध्ये पालिकेचे अधिकारी अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेले असता राजेंद्र चौधरी यांनी हस्तक्षेप केला होता. तेव्हा निंबाळकर यांनी तुमचे नगरसेवक पद रद्द का करू नये यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावून चौधरी यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका केली होती.

loading image
go to top