जलयुक्त शिवारची ठेकेदारांनी लावली वाट : राजेंद्र सिंह

वृत्तसंस्था
रविवार, 11 जून 2017

देशातील एक पथदर्शी योजना म्हणून महाराष्ट्रातील "जलयुक्त शिवार' योजनेची ख्याती असली तरी त्यात ठेकेदार आल्याने त्याची वाट लागल्याचे मत वॉटरमॅन राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

डोंबिवली : देशातील एक पथदर्शी योजना म्हणून महाराष्ट्रातील "जलयुक्त शिवार' योजनेची ख्याती असली तरी त्यात ठेकेदार आल्याने त्याची वाट लागल्याचे मत वॉटरमॅन राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

सुभेदार वाडा कट्ट्याच्या दुसऱ्या वर्षपूर्ती सोहळ्यासाठी ते रविवारी सावित्रीबाई फुले रंगमंदिरात आले होते. सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद भागवत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जलयुक्त शिवार, नदीजोड प्रकल्प आणि नद्यांची सद्यस्थिती यावर परखडपणे भाष्य केले. महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगल्या भावनेने जलयुक्त शिवार योजना सुरू केली. लोकांनीही अतिशय निर्मळ।मनाने त्यासाठी भरभरून मदत केली. मात्र त्यात ठेकेदार आणि कंपन्या शिरल्या आणि सर्व गडबड झाल्याचे मत राजेंद्र सिंह यांनी व्यक्त केले. तर नदीजोड प्रकल्पावर वाजपेयी सरकारपूर्वी नेहरूंच्या काळातच काम सुरू झाले होते. परंतू या प्रकल्पामुळे भौगोलिक आणि सांस्कृतिक वाद उफाळून येण्याची शक्‍यता असल्याने आपल्या देशासाठी तो धोकादायक आहे असेही ते म्हणाले. दरम्यान रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गृहसंकुलांचा राजेंद्र सिंह यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे, उपमहापौर मोरेश्वर भोईर, मनसे गटनेते मंदार हळबे, महापालिका उपायुक्त सुनील लहाने, सुभेदार वाडा कट्ट्याचे दिपक जोशी, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

जलबचतीसाठी लोकसहभाग आवश्‍यक असून लोकचळवळ उभी राहिली तरच जलसुरक्षा आणि जलसाक्षरता होऊ शकेल.
- राजेंद्र देवळेकर, महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
मोदींचे कोट विकले, तरी कर्जमाफी होईल: संजय राऊत
लोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी

अंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन​
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

Web Title: rajendra singh jalyukt shivar dombinwali news marathi news maharashtra news