राजकुमार बडजात्या यांचे मुंबईत निधन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

मुंबई - ‘राजश्री प्रॉडक्‍शन’चे प्रमुख आधारस्तंभ व निर्माते राजकुमार बडजात्या (वय ७७) यांचे आज सकाळी मुंबईतील खासगी रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर वरळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात मुलगा सूरज आणि एक मुलगी आहे. राजाबाबू म्हणून प्रसिद्ध असलेल्या बडजात्या यांनी ‘मैने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ साथ है’,  ‘प्रेम रतन धन पायो’ आदी चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक व्यक्तींनी शोक व्यक्त केला.

Web Title: Rajkumar Badjatya Death