आंबेडकर, ओवेसींच्या जोडीला राजू शेट्टी ?

Raju Shetty joining Ambedkar Ovesi?
Raju Shetty joining Ambedkar Ovesi?

मुंबई : भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी यांनी बहुजन वंचित आघाडीची घोषणा केलेली असताना, आज मुंबईत राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात आघाडीसंदर्भात चर्चा झाली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची बैठक झाली. 

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आघाडी संदर्भात गाठीभेटींना सुरवात केली असतानाच आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात महत्त्वपूर्ण बैठकीस सुरुवात झाली आहे. या बैठकीला आमदार कपिल पाटील व स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर उपस्थित आहेत. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांनी राज्यात युती केली आहे. या युतीला बहुजन वंचित आघाडी असे नाव देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com