भाजपविरोधात एकच आघाडी उभारू : शेट्टी 

भाजपविरोधात एकच आघाडी उभारू : शेट्टी 

मुंबई : दलितांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजपचा पाडाव करणे आवश्‍यक आहे. मतविभाजन टाळण्यासाठी भाजपविरोधात एकच आघाडी करू, असे आवाहन आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या खासदार राजू शेट्टी यांनी भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांना केले आहे.

शेट्टी यांनी शनिवारी आंबेडकरांची भेट घेतली. शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या भेटीसाठी पुढाकार घेतला होता. वंचितांची एकच आघाडी असावी, असे आग्रही प्रतिपादन शेट्टी यांनी यावेळी केले. एमआयएमसमवेत आघाडी उभी केल्यानंतर भाजपविरोधी मतदार विभागले जातील काय असा प्रश्‍न राजकीय वर्तुळाला पडला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनीही आंबेडकरांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित आघाडीत यावे, असे प्रतिपादन केले आहे. आज कपिल पाटील तसेच "स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर हे प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला गेले होते. या भेटीत आंबेडकरांशी महत्त्वाची चर्चा झाली, असे उपस्थितांनी सांगितले.

आपण आशावादी आहोत, मतविभाजन होईल अशी भूमिका आंबेडकरांकडून कधीही घेतली जाणार नाही, असे शेट्टी यांनी नमूद केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com