आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिलांच्या दूसऱ्या पिढीतील महिलांनीही मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. यावेळी सर्व विडी कामगार महिला भावूक झाल्या होत्या.
मुंबई : रक्षाबंधन सण सर्वत्र उत्साहात साजरा झाला. सोलापूरमधील विडी महिला कामगारांनी उद्धव ठाकरेंना राखी बांधून उत्सव साजरा केला. सोलापूरमधील विडी कामगारांकडून दरवर्षी मातोश्रीवर येऊन रक्षाबंधन साजरा करतात.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील दरवर्षी रक्षाबंधनाला दरवर्षी सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिला राखी बांधत असत. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. विडी कामगार महिलांनी ही परंपरा सुरू ठेवली असून दरवर्षी रक्षाबंधनाला न चुकता मातोश्रीवर येऊन रक्षाबंधन उत्सव साजरा करतात.
आज रक्षाबंधनाच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील विडी कामगार महिलांच्या दूसऱ्या पिढीतील महिलांनीही मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांना राखी बांधली. यावेळी सर्व विडी कामगार महिला भावूक झाल्या होत्या.