कल्याण पूर्व सम्राट अशोक हायस्कुलच्या मुलींनी रिक्षा चालकांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

रविंद्र खरात 
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

रिक्षा चालकांच्या माध्यमातून संदेश जावा आणि रिक्षा चालकांना शिस्तीचे धडेही दिले. सोमवार ता. 27 ऑगस्ट ला कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक हायस्कुलच्या मुलींनी एक आगळीवेगळी रक्षाबंधन साजरा केली. 

कल्याण: कल्याण डोंबिवली शहरात खड्डेमय रस्ते आणि वाढती वाहतूक कोंडीमुळे सर्व सामान्य नागरिक त्रस्त झाले असून वाहतूक पोलिस, आरटीओ आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने एकत्र येऊन दिलासा द्यावा, त्यासाठी रिक्षा चालकांच्या माध्यमातून संदेश जावा आणि रिक्षा चालकांना शिस्तीचे धडेही दिले. सोमवार ता. 27 ऑगस्ट ला कल्याण पूर्व मधील सम्राट अशोक हायस्कुलच्या मुलींनी एक आगळीवेगळी रक्षाबंधन साजरा केली. 

आज सोमवार ता. 27 ऑगस्ट ला कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर 
सम्राट अशोक हायस्कुलचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, संगीता पाटील, शोभा देशमुख, ओमप्रकाश धनविजय, गणेश पाटील, आदी शिक्षक वर्ग,
शिवसेना नगरसेवक आणि रिक्षा, टॅक्सी संघटना अध्यक्ष प्रकाश पेणकर, संतोष नवले, आरटीओचे वाहन निरीक्षक जाफर काझी, डी के महाले आणि रेल्वे पोलिस अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रिक्षा चालक आणि रिक्षाला राखी बांधण्यात आली. यावेळी रिक्षा चालक बांधवांना एक पत्र देण्यात आले.

रिक्षा चालकांना शिस्तीचे धडेही विद्यार्थ्यांनी दिले. तर या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वांनी स्वागत करत एकत्र येऊन वाहतूक कोंडी दूर करण्याचे आश्वासन उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थी वर्गाला दिले.

Web Title: Rakshabandhan celebrated with the autorickshaw drivers of Ashok High School Kalyan