वाड्यात सरकार विरोधात मोर्चा; जोरदार घोषणाबाजी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

वाडा : आपल्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज (ता. 29) शेतकरी कामगार पक्षातर्फे तहसीलदार कार्यालयावर भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, लाल सलाम लाल सलाम, कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय अशा असंख्य घोषणा देत सरकार विरोधात रोष व्यक्त केला. सर्वप्रथम  खंडेश्वरी नाका येथून रॅली काढून ही रॅली संपूर्ण वाडा शहरात फिरवून तहसीलदार कार्यालयाजवळ तिचे रूपांतर मोर्चात झाले.

या मोर्चाचे नेतृत्व शेकापचे तालुका चिटणीस सचिन मुकणे यांनी केले. मोर्चात बोलताना शेकापचे नेते सचिन मुकणे, प्रा. एस. ई. जाधव, गोपाल भगत आदी पदाधिकाऱ्यांनी सरकार विरोधात कडाडून टीका केली. सरकार सपशेल अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी मोर्चात केला. 

सरकारने आमच्या मागण्या गणपती सणापूवी न सोडवल्यास गणपती उत्सव तहसीलदार कार्यालयात साजरा करू असा गंभीर इशारा सचिन मुकणे यांनी प्रशासनाला दिला.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. 

मोर्चातील मागण्या 
वनहक्क कायद्यातंर्गत कसत असलेले वनहक्क दावेदार यांच्या कब्जेवहिवाटीनुसार 7/12 देण्यात यावा, शेतकऱ्यांना बी-बियाणे व खते मोफत देण्यात यावीत, आदिवासींना बंद केलेले खावटी कर्ज पुन्हा सुरू करून तत्काळ देण्यात यावे, तिळसा येथे नवीन पोलिस चौकी मंजूर करा, वाडा येथे अद्यायावत शासकीय वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय करा, स्वामिनाथन आयोगाच्या शेतकरी हिताच्या शिफारसीची अंमलबजावणी करा, तुसे येथील दोडेपाडा, कुवरापाडा, बेडेपाडा, फणसपाडा येथे स्मशानभूमी मंजूर करा 

विलकोस, भुदानपाडा, पलाटपाडा, खुपरी येथील कोगिंलपाडा येथे नवीन विज जनित्र बसवून विज जोडणी द्या, निकृष्ठ झालेल्या रस्त्यांची गुणनियंत्रण मंडळा मार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा, वाडा शहराच्या हद्दीत असलेली कॅपेसिट कंपनी पासून ध्वनी व वायु प्रदूषण होत असल्याने कंपनीवर कारवाई करा, कंपन्यात स्थानिकांना रोजगार द्या, रोजगार हमीची कामे सुरू करा अशा अनेक मागण्या मोर्चात करण्यात आल्या.
 
Web Title: rally on tehsil office for demand in wada