बायोमॅट्रिक रेशनकार्डसंदर्भात कॉंग्रेस काढणार आज मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

मुंबई - बायोमॅट्रिक ठशांद्वारे रेशनकार्ड आधारशी जोडताना होणाऱ्या गोंधळामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नागरिकांच्या या त्रासाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेसच्या मुंबई प्रदेश सचिव माधवी राणे यांच्या नेतृत्वाखाली गोरेगावमध्ये गुरुवारी (ता. 12) मोर्चा काढण्यात येणार आहे. 

बायोमॅट्रिक ठसे घेताना फक्त कुटुंबप्रमुखाच्या अंगठ्याचे ठसे घेतले जातात. मात्र त्यानंतरही त्या शिधापत्रिकेवरील साऱ्या कुटुंबाचा शिधा दिला जात नाही, तर केवळ कुटुंबप्रमुखाच्या कोट्याचाच शिधा दिला जातो. ज्या कुटुंबांचे बायोमॅट्रिक ठसे घेतले नाहीत, त्या कुटुंबांना शिधाच मिळत नाही, अशाही तक्रारी आहेत. नागरिकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू नये यासाठी जुन्या पद्धतीने शिधा द्यावा, अशी मागणी माधवी राणे यांनी केली. बायोमॅट्रिक करण्याचा वेगही अत्यंत कमी आहे, हे काम करणारी एजन्सी व्यवस्थित काम करीत नाही. त्यामुळे नागरिकांना रजा घेऊन दिवसभर रांगेत उभे राहावे लागते, अशाही तक्रारी आहेत. 

Web Title: rally will be for Congress to biometric ration cards

टॅग्स