सोनू सूदच्या पाठिशी भाजप; संजय राऊतांच्या लिखाणावर टीका..

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 7 June 2020

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केलेत. सोनू सूद हा केवळ मुखवटा आहे. त्यामागचा खरा चेहरा वेगळाच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर संजय राऊतांच्या टीकेवर भाजप नेते राम कदम यांनी पलटवार केला आहे. 

मुंबई: लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याची सोय करत आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनूच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोनू सूद यानं केलेल्या कामावर सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली आहे. 

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केलेत. सोनू सूद हा केवळ मुखवटा आहे. त्यामागचा खरा चेहरा वेगळाच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर संजय राऊतांच्या टीकेवर भाजप नेते राम कदम यांनी पलटवार केला आहे. 

 हेही वाचा: सोमवारपासून एसटीच्या 250 जादा बस धावणार; वाचा कोणासाठी आणि कुठे सेवा सुरू होणार

 

संजय राऊत यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आहे. कोरोना रुग्णांना महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये जागा नाही म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत. प्रत्येक घरात उपासमार सुरू आहे. अशा वेळी तुम्ही गरिबाला एका पैशाची मदत केली नाही. दुसरे करतात त्यांना तरी करू द्या,' असं राम कदम यांनी राऊत यांना सुनावलं आहे.

महाराष्ट्र सरकार अपयशी ठरलं आहे. सोनू सूदवर आरोप करून हे अपयश झाकलं जाणार नाही. सोनू सारखे लोक माणुसकीच्या नात्यानं कोणाला मदत करण्यासाठी पुढं येत असतील तर त्यांचं कौतुक करायचं सोडून त्यांच्यावर टीका करता. हाच तुमचा माणुसकीचा धर्म आहे का, असा प्रश्न राम कदम यांनी केला आहे.

 

 

संपूर्ण महाराष्ट्रात हॉस्पिटल मध्ये जागा नाही ? म्हणून लोक घरी तडफडून मरता आहेत ? प्रत्येक घराघरात उपासमार सुरू आहे ?मात्र तुम्ही गरिबाला एका पैशाची अजून मदत केली नाही दुसरे करतात त्यांना तरी करू द्या, असंही राम कदम यांनी म्हटलं आहे. 

जे काम महाराष्ट्र सरकारचे आहे. ते काम सरकारने केले नाही. सोनू सूद सारखा अभिनेता रस्त्यावर उतरून स्वत:च्या खिश्यातील पैसे खर्च करून गरिबांना मदत करत असले तर त्यावर टीका करणे ही संस्कृती आहे का? शिवसेनेचे नेते असे करणार आहे का? असा सवालही कदमांनी केला.

 

 

काय म्हणाले संजय राऊत: 

शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात राऊत यांनी सोनू सूद प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे. 

ठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न: 

महाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी मदत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे महात्मा सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.

हेही वाचा: वाचाल तर थक्क व्हाल! तब्बल इतक्या मुंबईकरांनी घेतला मद्याच्या 'होम डिलिव्हरी'चा लाभ

सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, :बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) आणि त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.

ram kadam criticized sanjay raut on sonu sood statement read full story


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ram kadam criticized sanjay raut on sonu sood statement read full story