राम जन्मला गं सखी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

ठाणे - दरवर्षी चैत्र शुक्‍ल नवमी तिथी माध्यान्हकाली श्रीरामजन्म उत्सव साजरा होतो.

यंदाही येथील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. 

ठाणे - दरवर्षी चैत्र शुक्‍ल नवमी तिथी माध्यान्हकाली श्रीरामजन्म उत्सव साजरा होतो.

यंदाही येथील प्राचीन कौपिनेश्वर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची रीघ लागली होती. 

महिलांनी रामजन्माचे पाळणे गाऊन जन्मोत्सवाचा सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला. भजन-कीर्तन करून रामजन्माचा जयघोष करण्यात आला. दरम्यान, खोपट येथील सिद्धेश्वरच्या १२५ वर्षे जुन्या राम मंदिरात मंदिर समितीने महाप्रसाद, भजन-कीर्तन ठेवले होते. या मंदिरात पुरातन काळापासून रामजन्माच्या सोहळ्यानंतर प्रत्येक भाविकांच्या घरून आणलेल्या डब्यांमधील प्रसाद भाविकांना वाटला जात असे; मात्र १९९१ पासून या मंदिरात भाविकांसाठी महाप्रसाद ठेवला जातो. प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मानंतर उपस्थित भाविकांनी श्रीरामाच्या नावाने जयघोष करून मंदिर परिसर दणाणून सोडला. या वेळी महिला भक्तांसह बालचमूंची संख्या लक्षणीय होती.

Web Title: Ram navami celebration in thane