कायद्याच्या चौकटीत राहून राम मंदिर मुद्दा हाताळणार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

मुंबई - अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा शिवसेना कायद्याच्या कक्षेत राहून हाताळेल, असे स्पष्टीकरण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. राम मंदिरासंदर्भात दोन दिवसांत भूमिका जाहीर करू, असेही ते म्हणाले. "सर्वांनी एकत्र येऊन राम मंदिर उभारायला हवे. "तेरी कमीज से मेरी कमीज भगवी कैसे', असा विषय काढू नये, असा टोलाही त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लगावला. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

मुंबई पालिका मुख्यालयातील नूतनीकरण झालेल्या पत्रकार कक्षाचे ठाकरेंच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. 20-25 वर्षांपासून निवडणुकांच्या तोंडावर राम मंदिराचा मुद्दा गाजतो. मोदी सरकारला सत्तेवर येऊन साडेचार वर्ष पूर्ण झाली आहेत. अखेरचे काही महिने उरले आहेत. आता मंदिर उभारू शकत नसाल, तर पुन्हा सत्तेत आल्यावर काय करणार, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मी राम मंदिराचा मुद्दा हाती घेतला, असे बोलले जाते; पण कोणाला तरी लक्षात आणून देण्यासाठी मी हा मुद्दा उपस्थित केला आहे. श्रीरामाचे दर्शन, संतांचे आशीर्वाद घेण्यासाठी; तसेच शरयू नदीची आरती करण्यासाठी मी अयोध्येत जाणार आहे. राम मंदिराच्या मुद्द्यावर आजवर केवळ राजकारण झाले. काही जण निवडणुकांच्या तोंडावर या मुद्द्याचे राजकारण करतात. या मुद्द्यावर न्यायालयानेही आदेश दिले आहेत. वस्तुस्थितीची पाहणी करून एक-दोन दिवसांत पुढील भूमिका जाहीर केली जाईल, असेही ते म्हणाले. महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर, महापालिका आयुक्त अजोय मेहता, बृहन्मुंबई महापालिका वार्ताहर संघाचे अध्यक्ष विष्णू सोनावणे या वेळी उपस्थित होते. 

Web Title: Ram temple issue