राम मंदिरासाठी कायदा करावाच लागेल : उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

''राम मंदिरासाठी कायदा करावाच लागेल. जोपर्यंत झोपलेला कुंभकर्ण जागा होत नाही. राम मंदिर न्यायालयाच्या निर्णयाने नाहीतर कायदा करून उभे करा. तोपर्यंत शिवसेना राम मंदिराचा जागर करत राहणार आहे''.

- उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख

मुंबई : ''राम मंदिरासाठी कायदा करावाच लागेल. जोपर्यंत झोपलेला कुंभकर्ण जागा होत नाही. राम मंदिर न्यायालयाच्या निर्णयाने नाहीतर कायदा करून उभे करा. तोपर्यंत शिवसेना राम मंदिराचा जागर करत राहणार आहे'', अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

राज्यातील पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली. यामध्ये त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावर भाष्य केले. ते म्हणाले, जोपर्यंत झोपलेला कुंभकर्ण जागा होत नाही. राम मंदिर न्यायालयाच्या निर्णयाने नाहीतर कायदा करून उभे करा. तोपर्यंत शिवसेना राम मंदिराचा जागर करत राहणार आहे. राम मंदिरासाठी कायदा करावाच लागेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच 24 डिसेंबरला पंढरपुरात यासाठीच सभा घेण्यात येणार आहे. राम मंदिराला जाऊन आलो याचा अर्थ राम मंदिराचा मुद्दा संपला नाही, असे नाही. तसेच राम मंदिर झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. 

दरम्यान, राम मंदिराच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब अयोध्या येथे गेले होते. त्यानंतर आता त्यांनी राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुढे केला आहे. 

Web Title: For Ram Temple must make a law says Uddhav Thackeray