काय आहे रामदास आठवलेंचा 3 - 2 चा फॉर्म्युला ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होणार यावर मंथन सुरु आहे. दरम्यान, महाशिवआघाडी म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस गोड बातमी कधी देणार याचीच वाट महाराष्ट्र पाहतोय. मात्र, शिवसेना-भाजप आणि महायुतीचं सरकार आता येणारच नाही असं देखील स्पष्टपणे सांगता येत नाहीये.    

महाराष्ट्रात कधी सरकार स्थापन होणार यावर मंथन सुरु आहे. दरम्यान, महाशिवआघाडी म्हणजेच शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस गोड बातमी कधी देणार याचीच वाट महाराष्ट्र पाहतोय. मात्र, शिवसेना-भाजप आणि महायुतीचं सरकार आता येणारच नाही असं देखील स्पष्टपणे सांगता येत नाहीये.    

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबीनेटमधले मंत्री  रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठीचा फॉर्म्युला सुचवलाय. रामदास आठवले यांनी संजय राऊत यांच्यासोबत चर्चा करून 3 आणि 2 चा फॉर्म्युला सुचवलाय. यामध्ये भाजपकडे 3 वर्ष मुख्यमंत्रिपद तर शिवसेनेला 2 वर्ष मुख्यमंत्रिपद असा हा फॉर्म्युला आहे. रामदास आठवले यांच्या सांगण्यानुसार भाजपला हा फॉर्म्युला मान्य असेल तर शिवसेना देखील विचार करू शकते असं म्हटलं जातंय. दरम्यान, याबाबत भाजपशी बोलणार असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलंय. 

महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना आणि भाजपात फाटलंय. त्यामुळे NDA तून देखील शिवसेना बाहेर पडली आहे. NDA च्या बैठकीत शिवसेनेचा नेता नव्हता. दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीत मात्र शिवसेनेचे विनायक राऊत हजर होते. माझ्या मते ''आता शिवसेना आणि भाजप मधील भांडण मिटायला हवं. मी अमित भाई (अमित शाह) यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे" असं रामदास आठवले यांनी सांगितलंय. अमित शाह यांनी महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपचं सरकार येईल असा विश्वास व्यक्त केलाय. सर्व गोष्टी योग्य दिशेने जात असल्याचं अमित शहा यांनी म्हणाल्याचं देखील रामदास आठवले यांनी म्हटलंय.

Webtitle : Ramdas Athawale suggests 3-2 formula to sanjay raut to form government 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramdas Athawale suggests 3-2 formula to sanjay raut to form government