रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

मुंबई - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.

आठवले यांचा हा पुतळा 25 किलो मेणाचा वापर करून शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी बनविला आहे. हा पुतळा लोणावळा येथील वॅक्‍स म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे. शिल्पकार कुंडीलूर यांच्या शिल्पकलेचे कौतुक मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केले. या वेळी आठवले यांच्यासह पत्नी सीमा आठवले व मुलगा जीत आठवले तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: ramdas athawale wax statue