रमेश कदमांची तुरूंगाबाहेर परत अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

अण्णाभाऊ साठे महांडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरूंगात असलेले रमेश कदम देखील सापडले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.

मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारवाई करताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महांडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरूंगात असलेले रमेश कदम देखील सापडले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही संयुक्त कारवाई केली.

या कारवाईत, रमेश कदम यांना ठाणे रुग्णालयातून जेजे रुग्णालयात प्राथमिक तपासणी नेण्यात आले असल्याचे समजले. मात्र तपासणी पुर्ण झाल्यानंतर पुन्हा तुरुंगात रवानगी अपेक्षित असताना पोलिस इस्कॉर्ट पार्टी अधिकारी आणि कर्मचारी त्याला एका माणसाच्या घरी नेले. त्याच वेळी गुन्हेशाखेच्या पोलिसांनी तिकडे धाड टाकली. आणि रमेश कदम आणि एका व्यक्तीला पोलिसांनी रोकडसह रंगे हात पकडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ramesh kadam arrested by election officer