रामनाथ मोते यांना मनसेचा पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 फेब्रुवारी 2017

ठाणे - कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ३ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. ४० वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले आणि दोन टर्म या मतदारसंघातून निवडून आलेले रामनाथ मोते यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक आणि शिक्षकेतर सेनेचे अध्यक्ष संजय चित्रे यांनी ठाण्यात पत्रकार परिषदेत पाठिंब्याची जाहीर घोषणा केली.

भाजपच्या पाठिंब्यावर निवडून येणारे उमेदवार म्हणून रामनाथ मोते यांची ओळख होती. यंदा भाजपने त्यांना पाठिंबा दिलेला नाही. अशा वेळी मनसेने त्यांना पाठिंबा दिल्याने त्यांच्यासाठी ही जमेची बाजू ठरली आहे. मोते यांची कल्याण येथील कार्यालयात सकाळी ७ पासून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी अविरत सेवा सुरू असते. १२ वर्षांत विधान परिषद सदस्य म्हणून विधान परिषदेत १०० टक्के उपस्थिती दर्शविल्याबद्दल त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला आहे. अनुदानित टप्प्यावरील विनाअनुदानित शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या, केंद्राप्रमाणे मुख्याध्यापकांना वेतनश्रेणी लागू करण्यासाठी असलेली लक्ष्यवेधी, तंत्रनिकेतन महाविद्यालयातील शिक्षकांचे प्रश्‍न, २०१२ नंतर आरटीईच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात निर्माण झालेली वाताहत, नवीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध, ग्रंथपालांच्या वेतनश्रेण्या, अनुदानित शाळांप्रमाणे विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना सहावा वेतन आयोगाप्रमाणे देण्यात येणाऱ्या वेतनासाठीचा लढा, आयसीटी विषय शिक्षकांच्या वेतनाबाबत सरकार दरबारी केलेला पाठपुरावा, कला व क्रीडा शिक्षकांच्या संदर्भातील आरटीईमुळे लोप पावलेल्या पदांच्या बाबतीत उभारलेला लढा, आरटीईमुळे अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेशन व पगारासंदर्भात दिलेला लढा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मिळावी म्हणून केलेला संघर्ष, वेतन श्रेण्यांमधील तफावतीविरुद्ध केलेला लढा, या कामांची दखल घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याचे मनसेने सांगितले.

Web Title: Ramnath Mote MNS support