राणीबागेतील मृत पक्षी टॅक्‍सीडर्मितून पुन्हा जिवंत

नेत्वा धुरी - सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

मुंबई - देशातील एकमेव वन्यजीव जतन केंद्र असलेल्या बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राणीबागेतील चार पक्ष्यांना मरणोत्तर जीवदान मिळाले आहे. मॉटलड वूड्‌ ऑऊल, गोल्डन फिजंट; तसेच पहाडी मैनेची जोडी हे चार पक्षी आता पुनरुज्जिवीत झाले आहेत. उद्यानातील टेक्‍सीडर्मितज्ज्ञ आणि परळ येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीररचनाशास्त्र विभाग प्राध्यापक संतोष गायकवाड यांच्या कल्पनेतून हे पक्षी पुन्हा जिवंत झाले आहेत. हे चारही पक्ष्यांचा भायखळ्याच्या राणीबागेत मृत्यू झाला होता.

या पक्ष्यांचे मृत शरीर राणीबाग प्रशासनाने चार महिन्यांपूर्वी वन्यजीव जतन केंद्रात आणले होते. चार महिन्यांनी पक्षी तयार झाल्यानंतर जिमी या सिंहीणीच्या टॅक्‍सीडर्मिसह सगळे लवकरच राणीबागेत पाठवणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. तत्कालीन आयुक्त जयराज फाटक यांच्या आदेशानुसार राणीबागेतील मृत प्राण्यांचे संवर्धन करून टॅक्‍सीडर्मिच्या रूपाने लोकशिक्षणासाठी वापर केला जातो. त्या संकल्पनेनुसार राणीबागेतील मृत प्राणी आणि पक्ष्यांची टॅक्‍सीडर्मि केली जाते. याआधी राणीबागेतील मंगल नावाचा हिमालयीन अस्वल, सुसर, रोझीपॅलीकॅन नावचा ऑस्ट्रेलियन बगळा आणि अजगर यांना टॅक्‍सीडर्मिच्या स्वरूपात जतन करण्यात आले आहे. पालिकेचे आदेश असूनही भायखळ्यात नुकत्याच मृत्यू पावलेल्या पेंग्विनला वन्यजीव जतन केंद्रात का पाठवण्यात आले नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.

टॅक्‍सीडर्मि झालेले प्राणी आणि पक्षी
- 13 मोठे प्राणी
- सायबेरीयन वाघ, हिमबिबळ्या, रॉयल बंगाल वाघ
दोन सिंहिणी, दोन बिबटे
- 500 पक्षी
- 350 मासे

टॅक्‍सीडर्मिचा खर्च
छोट्या आकाराचा पक्षी : 3 हजार रुपये
मध्यम आकाराचा पक्षी : 5 हजार रुपये
मोठ्या आकाराचा पक्षी : 8 हजार रुपये

Web Title: ranibaug birds