राणीच्या बागेत आता परदेशी प्राणी व पक्षी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

मुंबई - "मफतलाल कंपनी'कडून आरक्षणांतर्गत मिळालेल्या भूखंडामुळे जिजामाता उद्यानाचा विस्तार होणार आहे. महापालिका या जागेत आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील पक्षी व प्राणी ठेवणार आहेत. भारतातून नामशेष झालेल्या चित्त्यासह आणि पांढरा सिंह आणला जाणार असून त्यांचे पिंजरे बांधण्यासाठी महापालिकेने सुमारे 90 कोटी रुपयांच्या निविदा मागविल्या आहेत. राणीच्या बागेच्या विस्ताराचे काम 2020 च्या अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. भायखळा येथील जिजामाता उद्यान व प्राणिसंग्रहालयालगतचा 58 हजार चौरस मीटरचा मफतलाल कंपनीच्या ताब्यातील भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित झाला आहे.
Web Title: Ranichi Baug Animal and Bird