राहुल गांधी यांनी अंदमानात जावं, तेंव्हाच सावरकरांच्या बलिदानाची किंमत समजेल - रणजित सावरकर

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

मुंबई - संजय राऊत यांनी आज सकाळी बेळगावला जाण्याआधी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलं. या विधानात संजय राऊत यांनी, ज्यांचा सावरकरांच्या भारतरत्नला विरोध आहे, त्यांना दोन दिवस तरी काळ्या पाण्याची शिक्षा द्या, असं विवादास्पद विधान केलं. यावरून  काँग्रेस नेत्यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. मात्र संजय राऊत यांच्या याच वक्तव्याचं विनायक दामोदर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी स्वागत केलंय.  

सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी संजय राऊत यांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. रणजीत सावरकरांनी यावेळी थेट राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. राहुल गांधींनी थेट अंदमानला काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जावं असा सल्ला दिला आहे. रणजीत सावरकर यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत तसं म्हटलंय. 

मोठी बातमी बोस' कंपनीने घेतला मोठा निर्णय, अनेकांच्या नोकऱ्या जाणार..
 
मोठी बातमी नवा दिवस नवा वाद; आदित्य ठाकरे संजय राऊतांना म्हणतात..

ज्यांना ज्यांना सावरकरांना  मिळणाऱ्या भारतरत्नावर आक्षेप आहे त्यांनी गोवा आणि अंदमानच्या जेलमध्ये जावे म्हणजेच त्या लोकांना सावरकरांच्या बलिदानाच महत्व कळेल, असंही रणजीत सावरकर म्हणलेत. आता तरी कॉंग्रेस नेत्यांनी सावरकरांविषयी काही विधान केल्यास त्यांना शिवसेना भीक घालणार नाही असंही रणजीत सावरकर म्हणालेत. 

Webtitle - ranjit savarkar grandson of vinakay damodar savarkar says 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ranjit savarkar grandson of vinakay damodar savarkar welcomes statement of sanjay raut