मुंब्र्यात 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार

किरण घरत
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

कळवा : मुंब्रा येथे राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीला कामावरून येताना घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवून दमदाटी करून दिवा येथील बंद खोलीत नेऊन बलात्कार केल्याची घटना सोमवारी दुपारी घडल्याचे उघडकीस आले आहे. सदर पीडित तरुणी मुंब्रा येथे राहते या संदर्भात मुंब्रा पोलिसांनी दोघा तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

पीडित तरुणी मुंब्रा येथून दिवा येथे कामावर गेली होती. सोमवारी (ता. 9) दुपारी साडे बाराच्या सुमारास कामावरून सुटल्यावर रिक्षाची वाट पाहत असताना तिची पाळत ठेवून असलेले तिच्या ओळखीचे नाराधम विशाल व रोशन यांनी रिक्षा घेऊन तिला रिक्षात बसण्याचा आग्रह केला व घरी सोडण्याचे आमिष दाखविले. रिक्षात बसल्यावर दमदाटी करीत तिला दिवा येथील बी. आर. नगर येथील बंद खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला पीडित तरुणीने कशी बशी आपली सुटका करीत आपले घर गाठले. तिने झाल्या प्रकाराची माहिती आपल्या आई वडिलांना दिल्यावर गुरुवारी (ता. 12) मुंब्रा पोलिसात तक्रार दाखल केली. 

दोघेही आरोपी फरार असून मुंब्रा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या संदर्भात मुंब्रा पोलीस अधिक चौकशी करीत आहेत,
   
Web Title: rape on 20 years old girl at mumbra