मुलगी झोपेत असताना तिला उचलून नेले अन् केला बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

रात्री 10 ते 11 च्या सुमारास आई आपल्या मुलांना झोपवून घराबाहेर कामानिमित्त गेली होती. तेव्हा अनोळखी वासनांध आरोपीने घरात प्रवेश करून, तिला रूममधून उचलून त्याच बाजूच्या रूममध्ये तिच्यावरजबरी संभोग केला आहे.

नालासोपारा : विरार मध्ये 9 वर्षांची मुलगी झोपली असताना तिला झोपेतून उचलून बाजूच्या रूम मध्ये नेऊन तिच्यावर जबरी संभोग केला असल्याची धक्कादायक घटना आज (ता. 01) उघड झाली आहे. याबाबत विरार पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपी विरोधात बलत्कार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू आहे.

विरार पोलिस ठाणे हद्दीत 30 जुलैला 9 वर्षांची चिमुरडी आपल्या 4 भावंडांसह घरात झोपली होती. आई फळ विक्रीचा तर वडील रिक्षाचालवण्याचा व्यवसाय करतात. रात्री 10 ते 11 च्या सुमारास आई आपल्या मुलांना झोपवून घराबाहेर कामानिमित्त गेली होती. तेव्हा अनोळखी वासनांध आरोपीने घरात प्रवेश करून, तिला रूममधून उचलून त्याच बाजूच्या रूममध्ये तिच्यावरजबरी संभोग केला आहे. 1 तासानंतर आई घरी आल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. घटनेच्या दोन दिवसानंतर पीडित मुलीच्या आईने विरार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून बलत्कार, पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आज (ता 01) विरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल दबडे, वसईचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी घटनास्थळाला भेट देऊन या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

आम्ही तक्रार नोंद केली आहे. यातील आरोपी अनोळखी आहे. आम्ही यासाठी स्वतंत्र पथक तयार केले आहेत. सर्व बाजूनी तपास करून आरोपीला लवकरच पकडू असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल दबडे यांनी सांगितले आहे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rape on 9 years old girl at Nalasopara