हवाई सुंदरीवर बलात्कार 

हवाई सुंदरीवर बलात्कार 

मुंबई - हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या 23 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी स्वप्नील बडोनिया (25) या सुरक्षा अधिकाऱ्याला अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही तरुणी हैदराबादवरून मुंबईला आल्यानंतर तीन जूनला हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले. 

हैदराबादहून एका विमानाने मुंबई विमानतळावर उतरलेली ही तरुणी कंपनीच्या कारने घरी जात होती. त्याच कारमध्ये असलेल्या बडोनियाशी तिची ओळख झाली. त्यानंतर तो आपल्या कारमध्ये बसवून तिला मालाड येथील इन्फिनिटी मॉलजवळील घरी घेऊन गेला. घरी सामान ठेवून हे दोघे जेवणासाठी एका रेस्टॉरंटमध्ये गेले. त्या ठिकाणी या दोघांनी रात्री उशिरापर्यंत मद्यपान केले. त्यानंतर रात्री उशिरा घरी जाणे योग्य ठरणार नाही, म्हणून या तरुणीने हॉटेलमध्ये राहण्याचे ठरवले; परंतु हॉटेलात खोली न मिळाल्यामुळे ती अंधेरी पूर्वेकडील शेर-ए-पंजाब कॉलनी परिसरातील बडोनियाच्या घरी गेली. 

त्या घरात स्वप्नील बडोनिया, त्याचा एक मित्र आणि एक महिला सहकारी असे तिघेजण राहतात. त्या ठिकाणी बडोनिया आणि त्याच्या मित्राने मारहाण करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप या तरुणीने केला होता; परंतु चौकशीत बडोनिया यानेच तिच्यावर बलात्कार केल्याचे पुढे आले, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. त्यानंतर अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून बुधवारी बडोनिया याला अटक केली. न्यायालयाने त्याला 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मारहाणीच्या खुणा 
मुलगी घरी न आल्यामुळे वडिलांनी तिच्या मित्राच्या मदतीने शोध सुरू केला. मोबाईलच्या आधारे शोध घेतला असता, ती मंगळवारी बडोनियाच्या घरात सापडली. तिच्या चेहऱ्यावर मारहाणीच्या खुणा होत्या. परळ येथील केईएम रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com