मोलकरणीवर बलात्कार; चार वकिलांवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

उल्हासनगर - घरातील खासगी बाब उघडकीस आणल्याच्या रागातून 45 वर्षांच्या मोलकरणीवर चार वकिलांनी सामूहिक बलात्कार केल्या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात आरोपीच्या आई आणि बहिणीला सहआरोपी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, "उल्हासनगर-4 मधील ओटी सेक्‍शन परिसरातील उल्हास मोरे, भाऊ सतीश व आई अक्काबाई यांच्यासह राहतात. ते दोघे व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्याकडे मी घरकाम करत होते. सहा महिन्यांपूर्वी मोरे यांच्या घरी त्यांची बहीण संगीता, मेव्हणा दीपक शहा व निकुंज रावळ आले होते. दीपक, निकुंज हेही व्यवसायाने वकील आहेत. त्यांच्यासमोर मोरे यांच्या घरातील खासगी बाब उघडकीस आणल्याच्या रागातून अक्काबाई व संगीता यांनी मला मारहाण केली. दीपक, निकुंज यांनी जबरदस्तीने खोलीत बंद करून माझ्यावर बलात्कार केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून उल्हास, सतीशनेही माझ्यावर अत्याचार केले. काम सोडल्यावरही दम देऊन सतीश माझ्या घरात येऊन बलात्कार करत होता. अखेर माझ्या भावाने घरात सीसी टीव्ही बसवला. त्याच्या पुराव्याच्या आधारे तक्रार दिली.' या प्रकरणी सतीशला अटक झाली असून, त्याला शनिवार (ता. 31)पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Web Title: rape case