सिव्हील रुग्णालयात चिमुकलीवर अत्याचार 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 मे 2018

ठाणे - ठाण्यातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईला भेटण्यासाठी आलेल्या सहा वर्षांच्या मुलीवर तेथील सुरक्षारक्षकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हरिष नरवार (52, रा.कळवा) असे या नराधमाचे नाव आहे. हरिषला ठाणे नगर पोलिसांनी अटक केली असून त्याला 15 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

आईला भेटण्यासाठी ही मुलगी गुरुवारी दुपारी वडिलांसोबत रुग्णालयात आली होती. दुपारी 4.15 वाजण्याच्या सुमारास ती पाणी आणण्यासाठी रुग्णालयातील तळमजल्यावर गेली असता तेथील प्रसूतिगृहाबाहेर बसलेल्या हरिषने एका खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुलीने हा प्रकार वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी बालअत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवून हरिषला अटक केली, अशी माहिती ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली. 

आठवडाभरापूर्वी महिलेशी असभ्य वर्तन 
नरवार यापूर्वी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात काम करत होता. वर्तणूक चांगली नसल्याने काही वर्षांपूर्वी त्याची बदली सिव्हील रुग्णालयात झाली होती. या रुग्णालयात बाळ चोरीचे प्रकरण घडल्यानंतर त्याला प्रसूतिगृहाबाहेर तैनात करण्यात आले होते. आठवडाभरापूर्वीही त्याने या रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी विभागात आलेल्या महिलेशी असभ्य वर्तन केले होते. त्यानंतर तेथे हजर असलेल्या महिलांनी त्याला चोप दिला होता, अशी माहिती रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी दिली. 

Web Title: rape case in civil Hospital