याचिकेच्या सुनावणीला आणखी मुदत नाही

याचिकेच्या सुनावणीला आणखी मुदत नाही

मुंबई - महालक्ष्मी येथील शक्ती मिल परिसरात झालेल्या बलात्कार खटल्यातील दोषींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले आहे. याप्रकरणी सुनावणीसाठी आणखी मुदत मिळणार नाही, असे उच्च न्यायालयाने बुधवारी (ता. 6) राज्य सरकारला सांगितले. 

सत्र न्यायालयाने या प्रकरणातील तीन दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे. महिला छायाचित्रकारावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली सत्र न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले. त्यापैकी तिघांना फाशी आणि एकाला जन्मठेप अशा शिक्षा सुनावल्या असून, अल्पवयीन दोषीला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. 

दिल्लीतील "निर्भया' सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर संबंधित कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्या तरतुदींच्या आधारे दोषींना शिक्षा झाली आहे. या तरतुदींना आव्हान देणारी याचिका दोषींनी केली आहे. याबाबत राज्य सरकारने तातडीने सुनावणी घेणे अपेक्षित होते; मात्र अद्याप सुनावणी झालेली नाही. या याचिकेवरील सुनावणी 20 फेब्रुवारीपासून घेतली जाईल, असे उच्च न्यायालयाचे न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने बुधवारी जाहीर केले. 

दोषींच्या फाशीवरील सुनावणीही अन्य न्यायालयात प्रलंबित आहे. सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासिम बंगाली, सलीम अन्सारी या दोषींना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारतीय दंड विधानातील कलम 376 (ई) नुसार बलात्काराच्या गुन्ह्यात दोन वेळा शिक्षा झाली असल्यास दोषीला फाशी किंवा जन्मठेप ठोठावता येते. या तरतुदीला त्यांनी आव्हान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com