शिवडीत बालिकेवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

शिवडी - अल्पवयीन बालिकेवर झालेल्या बलात्कारप्रकरणी शिवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. येथील शिवडी बंदर रोड परिसरातील झोपडपट्टीत राहणारा आरोपी एका खासगी कंपनीत हमाल म्हणून कामाला आहे. रविवारी सुट्टी असल्याने तो घरी होता. त्याची पत्नी कामावर गेली होती. घरात आरोपीची मुलगी होती. त्याच्या मुलीबरोबर खेळण्यासाठी व टीव्ही बघण्यासाठी पीडित मुलगी नेहमी त्यांच्या घरी जात असे. टीव्ही बघण्याच्या बहाण्याने तिला त्याने घरात बोलावले. त्याची मुलगीही घरात होती; मात्र तिला दुकानात पाठवून त्याने बलात्कार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून तिच्या आईने विचारपूस केली असता, हा प्रकार समोर आला. त्यानंतर या नराधमाला नागरिकांनी त्याच्या घरात कोंडून ठेवले. त्यानंतर शिवडी पोलिसांनी आरोपीला घटनास्थळावरून अटक केली. पीडित मुलीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे तिच्या आईने सांगितले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर नावगे यांनी सांगितले.
Web Title: rape on girl