गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

मुंबई : गुंगीचे औषध असलेला पेढा देऊन युवतीवर बलात्कार करणाऱ्या 20 वर्षीय तरुणाला मरिन ड्राईव्ह पोलिसांनी मंगळवारी अटक केली. आरोपीने पीडित युवतीचे नग्न छायाचित्र काढून ते दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. त्यामुळे हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कार, विनयभंग तसेच माहिती तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे. 

मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका वसाहतीत आरोपी व पीडित युवती कुटुंबीयांसोबत राहतात. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये ती युवती आरोपीच्या घरासमोर आली असताना त्याने तिला पेढा दिला. त्यानंतर तिला गुंगी आल्यामुळे आरोपीने तिला घरी नेले. शुद्धीवर आल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत कुकर्म केल्याचे तिच्या लक्षात आले. त्यावेळी आरोपीने तिचे नग्न छायाचित्र दाखवून धमकावले. बदनामी करण्याची धमकी देत शरीरसुखाचीही वारंवार मागणी केली. तिने नकार दिला असता आरोपीने तिचे छायाचित्र त्या दोघांच्याही मित्रांना पाठवले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.

पीडित युवती आजारी पडल्याने पालकांनी तिला डॉक्‍टरांकडे नेले. तपासणीदरम्यान ती गर्भवती असल्याचे उघड झाले. मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.

Web Title: Rape on Girl Accused Arrested