शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार 

शाळकरी मुलीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार 

भिवंडी : भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका शाळकरी मुलीला लग्नाचे प्रलोभन दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच आरोपी फरारी झाला आहे. 

भिवंडी शहरातील कामगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मौलाना आझादनगर, शांतीनगर परिसरातील 17 वर्षीय शाळकरी मुलीला लग्नाचे अमिश दाखवून नराधम अजीम सलीम शेख (20, रा. गैबीनगर) याने 10 सप्टेंबर ते 24 ऑक्‍टोबर दरम्यान वेळोवेळी त्याच्या राहत्या घरी बोलावून पीडित मुलीवर अत्याचार केला. दुधाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या अजीम याच्याकडून वारंवार शारीरिक अत्याचार होऊ लागल्याने मुलीने लग्नाबाबत विचारणा केली; मात्र शरीरसुख घेतल्यानंतर नराधम अजीम याने लग्नास स्पष्ट नकार दिला.

त्यामुळे आपली फसगत झाल्याचे लक्षात येताच पीडित मुलीने आपल्या घरातील लोकांना ही माहिती दिली. त्यामुळे त्यांनी तातडीने शांतीनगर पोलिस ठाणे गाठून अत्याचारी अजीम शेखविरोधात बलात्काराची तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी व वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे समजताच अजीम फरारी झाला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वास जाधव करीत आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com