पोर्न व्हिडीओ पाहून बहिणीवर बलात्कार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नवी मुंबई - पोर्न व्हिडीओ पाहून एका १४ वर्षीय मुलाने आपल्या १६ वर्षीय बहिणीवर बलात्कार केल्याची धक्‍कादायक घटना कामोठ्यात घडली. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर ही घटना समोर आली. कामोठे पोलिसांनी आरोपी मुलास ताब्यात घेत त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.

जानेवारी महिन्यामध्ये आई-वडील गावी गेले असताना या मुलाने पहिल्यांदा बहिणीवर बलात्कार केला होता. त्यानंतर सलग दोन महिने त्याचे हे कृत्य सुरू होते. आरोपी हा नववीतील  विद्यार्थी आहे. पोर्न फिल्मच्या नादातून त्याने हे कृत्य केले असावे, अशी शक्‍यता आहे. आपली मुले काय करतात, यावरदेखील पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे, तरच अशा गुह्यांना आळा बसेल, असे  पोलिस उपनिरीक्षक पी. एस. भातुसे यांनी म्‍हटले आहे.

Web Title: Rape of sister after watching porn video