बलात्कारी अल्पवयीन असल्याने फाशी रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑक्टोबर 2019

बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात दोषीला ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली.

मुंबई : बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात दोषीला ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. गुन्हा घडला त्या वेळी आरोपी अल्पवयीन असल्याचे कागदपत्रांवरून दिसते, असे मत खंडपीठाने व्यक्त केले. 

या प्रकरणी संदीप शिरसाट याने फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या अपील याचिकेवर न्या. बी. पी. धर्माधिकारी आणि न्या. एस. के. शिंदे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्याला 2012 मध्ये बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात फाशीची शिक्षा झाली होती. आपला जन्म ऑगस्ट 1995 मधील असल्यामुळे गुन्ह्याच्या वेळी मी अल्पवयीन होतो. त्यामुळे मला बालसुधार कायद्यानुसार शिक्षा व्हायला हवी, असा बचाव त्याने केला होता. 

राज्य सरकारच्या वतीने त्याच्या दाव्याचे खंडन करण्यात आले. या घृणास्पद कृत्याबद्दल त्याच्याकडे बचावाची अन्य सबब नसल्याचे मत सरकारी वकिलांनी मांडले. तथापि, शाळेच्या दाखल्यानुसार शिरसाट त्या वेळी अल्पवयीन असल्याचे दिसते, असे मत खंडपीठाने व्यक्त केले आणि फाशीची शिक्षा रद्द केली. 

web title : Rapist released due to minor age


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rapist released due to minor age