दुर्मिळ गिधाडाचे प्रदर्शन पडले महागात

दुर्मिळ गिधाडाचे प्रदर्शन पडले महागात

मुंबई -  मध्य भारताततून मुंबईत आलेल्या दुर्मिळ व नामशेष प्रजाती म्हणून ओळखल्या जाणा-या पांढ-या पाठीच्या गिधाडाचे थेट चर्चमध्ये प्रदर्शन भरवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी फोर्ट येथील बिलार्ड पिअर्ड येथील चर्चमध्ये घडली. येशूच्या शुभेच्छा घेण्यासाठी गिधाडाला चर्चमध्ये आणल्याची माहिती प्राणिमित्र प्रदीप डिसूझा यांनी उपस्थितांना दिली. 

वनविभागाच्या परवानगीनेच गेल्या पाच महिन्यांपासून हे गिधाड दक्षिण मुंबईतील प्राणिमित्र प्रदीप डिसूझा यांनी सांभाळले होते. त्याला आज वनविभागाने राज्यातच नैसर्गिक अधिवासात सोडले. प्राणिमित्राच्या कृत्यानंतर केवळ कारणे दाखवा नोटीस धाडल्याने वनविभागावरच प्राणिप्रेमी संतापले आहे. मे महिन्यात रे रोड स्थानकावर गिधाड दिसत असल्याने वनविभागाने शोधमोहिम राबवली. मात्र गिधाड परतल्याचे वनविभागाने जाहीर केले. वडाळा येथे जखमी अवस्थेत प्राणिमित्र प्रदीप डिसूझा यांनी पांढ-या पाठीचे गिधाड आपल्या घरी उपचारांसाठी ठेवल्याची बातमी वनविभागाने लपवून ठेवली. त्याचा अगोदरची प्राणिमित्र प्रदीप डिसूझा यांची कामगिरी चांगली असल्यानेच गिधाड सांभाळण्याची परवानगी दिल्याचे सांगत ठाणे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक आर कदम यांनी सांगितले. त्यामुळे कारणे दाखवा नोटीस डिसूझा यांना दिली असून, दंडही आकारला जाईल, असे कदम म्हणाले. 

मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तसेच प्राण्यांच्या देखभालीसाठी कात्रज येथे प्राणिसंग्रहालय असतानाही वादग्रस्त प्राणीप्रेमी प्रदीप डिसूझा यांना गिधाड सांभाळण्याचा निर्णय का दिला, असा संतप्त सवाल मुंबईचे मानद वन्यजीव रक्षक सुनीश कुंजू यांनी विचारला. हे गिधाड वैद्यकीय तपासणीनंतरच सोडले जावे तसेच काही दिवस वनविभागाच्या निगराणीत ठेवले जावे, अशी मागणीही कुंजू यांनी वनविभागाकडे केली. मात्र बुधवारी सकाळीच त्याल सोडण्यात आल्याने कुंजू यांनी संताप व्यक्त केला. वनविभागाच्या या गोंधळाबाबत नागपूरातील मुख्य कार्यालयातही कुंजू यांनी तक्रार दाखल केली आहे. प्राणिमित्र प्रदीप डिसूझा यांच्यावर गुन्हा दाखल केला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. प्राणिमित्र प्रदीप डिसूझा यांची  जबावनोंदणी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com