छोटा राजनविरोधातील शकीलचे "हत्यार' 

छोटा राजनविरोधातील शकीलचे "हत्यार' 

मुंबई - छोटा शकीलचा विश्वासू व डी कंपनीचा शार्पशूटर रशीद मलबारी याला अबुधाबीत तेथील पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती वरिष्ठ पोलिस सूत्रांनी दिली. मलबारीने 2014 मध्ये पॅरोलवर बाहेर आल्यावर पश्‍चिम बंगाल-बांगलादेश मार्गे पलायन केल्याचे मानले जाते. 

अबुधाबीमध्ये मलबारीला बांगलादेशी पासपोर्टवर पकडण्यात आले आहे. कर्नाटकातील त्याच्या भावाने ही व्यक्ती रशीद मलबारीच असल्याचा दुजोरा केंद्रीय यंत्रणांना दिला आहे. मलबारीच्या अटकेबाबत मुंबई पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली आहे; पण त्याबाबत अद्याप मुंबई पोलिसांनी कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही. कर्नाटक पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट सर्कुलर जारी केल्यामुळे त्यांना त्याचा ताबा मिळू शकतो, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

भारतात व परदेशात छोटा राजन टोळीच्या अनेक गुंडांच्या हत्येत मलबारीचा सहभाग होता. थायलंडमध्ये छोटा राजन व इजाझ लकडावालावर झालेल्या गोळीबारातही त्याचा सहभाग होता. त्यांच्या विरोधात कर्नाटक व मुंबईत अनेक गुन्हे दाखल आहेत. 

2009 मध्ये वरुण गांधी, प्रमोद मुतालीक यांच्यासह भाजप व श्रीराम सेनेच्या नेत्यांची हत्या करण्याच्या हेतूने आल्याच्या आरोपाखाली मंगलोर पोलिसांनी मलबारीला अटक केली होती. 2014 मुंबई पोलिसांनी 1998 मधील शब्बीर पठाण याच्या हत्या प्रकरणात त्याचा ताबा घेतला होता. त्यानंतर त्याला पुन्हा कर्नाटकला पाठवण्यात आले होते. 

आजारी ते फरारी 
21 जुलै 2014 ला बेंगळूरु मध्यवर्ती कारागृहात असताना मलबारीने पत्नीच्या आजारपणाचे कारण सांगत पॅरोल मिळवला होता. त्यानंतर तो पुन्हा परतलाच नाही. न्यायालयाने त्याला फरारी घोषित करून वॉरंट जारी केले होते. पुढे पोलिसांनी लुक आऊट सर्कुलर व रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com