रश्मी बागल, निर्मला गावित शिवबंधनात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आणि रश्मी बागल यांच्या हाती भगवा दिला. तसेच काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या करमाळ्यातील नेत्या रश्मी बागल, त्यांचे बंधू दिग्विजय बागल, विलास घुमरे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना आज शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधले आणि रश्मी बागल यांच्या हाती भगवा दिला. तसेच काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला.

रश्मी बागल या शिवसेनेत प्रवेश करणार, हे दोन दिवसांपूर्वीच निश्चित झाले होते. तशी घोषणाही त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन केली. परंतु कालच्या ऐवजी आज त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्याबरोबर दिग्विजय बागल, विलास घुमरे आणि अन्य कार्यकर्ते होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rashmi Bagal and Nirmala Gavit enters in Shivsena