राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा-विधानसभा निवडणुकीत कमबॅक करणार

ulhasnagar
ulhasnagar

उल्हासनगर : भाजप अतिरेक करत असतानाही शिवसेना राजीनामा देण्याऐवजी त्यांना साथ देत आहे. दोन्ही पक्ष एकाच माळेतील मणी असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे.विशेेेष म्हणजे कल्याण डोंबिवली म्हणगपालिका व मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपा या दोन्ही पक्षांनी वेगवेगळी निवडणूक लढवताना एकमेकांवर ताशेरे ओढले.आणि सत्तेप्रसंगी दोघांनी पुन्हा हातमिळवणी केली.मतदारांना वेळ्यात काढले. त्यामुळे नागरिकांचा कल राष्ट्रवादीकडे वळत असल्याचे चित्र असून ते पाहता येत्या लोकसभा-विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस हमखास कमबॅक करणार असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी उल्हासनगरात व्यक्त केला.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुक लक्षात घेता शहरातील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू असून प्रत्येक प्रभागात कार्यकर्त्यांची फळी उभारली जात आहे. उल्हासनगर शहरात कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नसून अनेक ज्वलंत समस्या निर्माण झाल्या आहेत . या समस्या सोडवण्यासाठी व सत्ताधारी पक्षाला जाब विचारण्यासाठी स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व नगरसेवक कोठेतरी कमी पडले असल्याचे तपासे यांनी मान्य केले. मात्र या विधानसभेच्या आमदार ज्योती कलानी यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे विधानसभेत मांडले आणि आपल्या आमदार निधीचा या मतदार संघासाठी उपयोग केला आहे . आता पक्षाला नव्याने उभारी घेण्याची आवश्यकता असून आम्ही पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देणार आहोत. उल्हासनगर मतदार संघात पुन्हा ज्योती कलानी विजयी होणार असून अंबरनाथ विधानसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी मिळेल अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्याचबरोबर येथे आम्ही यावेळी नक्कीच बाजी मारू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

कल्याण लोकसभा मतदार संघातील उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराकडे विद्यमान शिवसेना खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या विकासकांच्या बाबतही महेश तपासे यांनी प्रश्न उपस्थित केला.त्यांनी केवळ वर्षातून एकदा अंबरनाथला "शिवमंदिर उत्सव" कार्यक्रम कसा सुपरडुपर हिट करायचा यावरच  भर दिला आहे.असा आरोप तपासे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com