दिवाळी फराळ सामान्यांना परवडणार का ?

दिवाळी फराळ सामान्यांना परवडणार का ?

"यंदां मी खूप बिझी आहे, मला यावेळी फराळ करणं नाही जमणार.. मी तर बाजारातून आणणार यंदा फराळ ", हे वाक्य सध्या दररोज आपल्या कानावर पडतंय. पण तुमचा रेडीमेड फराळ आता महागणार आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांना आता परवडणार का असा प्रश्न उपस्थित होतोय.   

लांबलेल्या पावसामुळे दिवाळी फराळ महागण्याची शक्यताय. पावसाचा यंदा तूरडाळ वगळता सर्वच डाळींना फटका बसला आहे. हरभरा डाळीच्या किमती वाढत असल्याने ऐन दिवाळीत लाडू महागणार आहे. एकूणच यंदा दिवाळीचा फराळ सर्वसामान्यांसाठी महागणार आहे.

दिवाळीतील फराळ तयार करण्यासाठी प्रामुख्याने विविध डाळींचा उपयोग होतो. हरभरा डाळीच्या बेसनापासून तयार केला जाणारा लाडू खवय्यांच्या मोठ्या पसंतीचा असतो. यामुळे त्याची मागणी सर्वाधिक असते. मात्र आता बाजारात हरभरा डाळ आणि बेसनाच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. पण त्या तुलनेत पीक कमी असल्याने पुढील आठवडाभरात हरभरा डाळीचे भाव भडकण्याची शक्यता आहे.

आपल्या दैनंदिन आयुष्यात, आपलं कामकाज सांभाळून घरीच फराळ बनवणं फार कठीण झालंय. अशात सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे बाजारातील तयार फराळ. पण लांबलेल्या पावसाचा फटका हा डाळींच्या उत्पादनाला बसलाय. त्यामुळे, सर्वसामान्यांना या भाववाढीचा फटका नक्कीच बसेल. 

WebTitle : rates of diwlai faral increased due to extended rainfall in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com