भरवस्तीत घुसले खवले मांजर

भरवस्तीत घुसले खवले मांजर

कोलाड : रोहा तालुक्‍यातील वरसे जवळच्या भुवनेश्‍वर येथे शनिवारी भरवस्तीत खवले मांजर नागरिकांना दिसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परंतु स्थनिक तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याला पकडून तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दिले. 

भरवस्तीत खवले मांजर दिसल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. तस्करी करण्यासाठी ते आणले होते का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. भीतीने या मुक्‍या जीवाला सोडले असावे, अशी चर्चा आहे. 
वस्तीत हा प्राणी दिसल्यानंतर तरुणांनी रोहा वनक्षेत्र कार्यालयाला माहिती दिली. या वेळी वनपाल आणि वनरक्षकांनी घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेतले. प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला फणसाड अभयारण्यात सोडले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

खवल्या मांजर हा दुर्मीळ प्राणी आहे. त्याची तस्करी करून लाखो रुपये मिळवणाऱ्या टोळ्या आहेत. दोन-तीन वर्षांत त्याच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. 

अन्न-पाण्याच्या शोधात खवले मांजर आजूबाजूच्या जंगलातून रोह्याच्या नागरी वस्तीत आले असावे. वरिष्ठांबरोबर चर्चा करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. 
- सचिन भांगरे, वनसंरक्षक रोहा 

रोहे तालुक्‍यात खवले मांजराची तस्करी होत असेल तर वनविभागाने त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. 
- रोशन चाफेकर, अध्यक्ष, सुराज्य सामाजिक संस्था 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com